गणेशोत्सव २०१३

नमस्कार मंडळी,
 
आपणास कळवण्यात अत्यंत आनंद होतो आहे कि ह्या वर्षीचा आपला गणेशोत्सव कार्यक्रम ९-१० सप्टेंबर रोजी हिंदू मंदिर हैप्पी वैलि येथे साजरा करण्यात आला. तसेच १४ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाचा कार्यक्रम करण्यात आला.
 
सोमवार ९ सप्टेंबर, गणेश चतुर्थी दिवशी सकाळी गणेश प्रतिष्टापना करण्यात आली. श्री शेखर अय्यर ह्यांनी उत्तम पौराहित्य करीत प्रतिष्ठापना पूजा करून घेतली. ह्या वर्षी आपले अध्यक्ष श्री नितीन राजकुवर व सौ अनुपमा राजकुवर ह्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. पूजा आरती  नंतर  गणपती अथर्वशीर्षाचे पठण  झाले. नंतर उपस्थित सर्व सभासदांना अल्पोपहाराचा लाभ झाला. संध्याकाळच्या आरतीला मोठ्या संख्येने सभासदांनी उपस्थिती लावली होती. आरतीनंतर महाप्रसादचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा सर्व उपस्थित सभासदांनी लाभ घेतला. मंगळवार १ सप्टेंबर, रोजी सकाळी आरती आणि संध्याकाळी विसर्जन पूजा करण्यात आली.
 
शनिवार १ ४ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाचा कार्यक्रम करण्यात आला. 
 
ह्या कार्यक्रमासाठी ह्या वर्षी मंडळा तर्फे लहान मुलांसाठी स्तोत्र  पठण व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्तोत्र पठण स्पर्धेमध्ये कुमार जयद डोंगरे ह्याने भाग घेतला होता व त्याने अत्यंत आत्मविश्वासाने स्पष्टपणे गणेश स्तोत्र म्हटले. ह्या स्पर्धेसाठी हा एकच स्पर्धक असल्या मुळे त्याला बक्षिश देण्यात आले. पुढील वेळी जास्त स्पर्धक पुढे येतील अशी अपेक्षा आहे. चित्रकला स्पर्धेसाठी अनेक मुलांनी भाग घेतला. ह्या स्पर्धेसाठी आपल्या सभासद सौ आसावरी वाडेकर ह्यांनी निवडलेली चित्रे काढून रंगवण्यात मुले दंग झाली होती. ह्या स्पर्धे साठी मुलांवर देखरेख करण्याचे काम मोनिका वाडेकर व प्रियांका सावंत ह्यांनी उत्तम रीत्या पार पाडले. चित्रकला स्पर्धेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येईल .  
 
गणेश विसर्जन कार्यक्रमाचे खास आकर्षण होते ते म्हणजे आपल्या सभासदांनी सादर केलेला 'अमृतगाथा' हा कार्यक्रम.  मराठी संतरचित अभंगांवर आधारीत हा कार्यक्रम सर्व उपस्थितांची मने जिंकून गेला. ह्या कार्यक्रमाची रूपरेखा आपल्या सदस्य मुग्धा करंजेकर रत्नपारखी ह्यांनी तयार केली होती. त्यांना श्री प्रदीप लाड, श्री जयराम परमेश्वरन ह्यांचे निपुण मार्गदर्शन लाभले. ह्या कार्यक्रमात प्रसाद पाटील, श्रुती पेंढारकर, कल्पना भेंडे, सौ आसावरी वाडेकर, करिष्मा पाताडे, पूर्णा म्हेसुर, स्वतः मुग्धा करंजेकर रत्नपारखी व जयराम परमेश्वरन ह्यांनी अभंग सादर केले. तबल्या वर श्री शरद दातार आणि प्रदीप लाड ह्यांनी तर पेटी वर जयराम परमेश्वरन व शाश्वत गांधी ह्यांनी साथ दिली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन मुग्धा करंजेकर रत्नपारखी व राहुल तिळवे ह्यांनी केले. ह्या कार्यक्रमाला उपस्थित प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
 
हा कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांनी बस मधून शेक ओ बीच कडे प्रस्थान केले. बीच वर गणपतीची आरती मोठ्या जल्लोषात करण्यात आली व गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषात गणेशाचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनानंतर सर्व उपस्थित सदस्यांनी माहाप्रसादाचा लाभ घेतला. त्यानंतर सर्व मंडळी परतीच्या मार्गाला लागली.
 
ह्या गणेशोत्सवासाठी अनेक सदस्यांनी देणगी स्वरूपात तसेच अनेक छोटी मोठी कामे करून मोठा हातभार लावला त्या बद्दल महाराष्ट्र मंडळ सर्वांचे आभारी आहे.
 
कार्यक्रमाची छायाचित्रे व चित्रफिती मंडळाच्या वेब साईट वर उपलब्ध आहेत. तरी आपण आपल्या वेब साईट वर भेट देउन संदीप भाटवडेकर, रुपेश पाताडे, आणि अमित रत्नपारखी ह्यांनी टिपलेल्या क्षणांचा आनंद घ्यावा.
 
मंडळाचा पुढील कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येईल. आपला सर्वांचा असाच प्रतिसाद मिळत राहील अशी अपेक्षा आहे.
 
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या .  
 
आपले नम्र,
महाराष्ट्र मंडळ, होंग कोंग.
 
Dear Members,
 
We are glad to inform that Maharashtra Mandal's Ganeshotsav 2013 celebrated with enthusiasm at Hindu Mandir, Happy Valley on 9-10 September. The Ganesh Visarjan program took place on 14th September at Shek O beach.
 
On Monday 9th September the 'Ganesh Chaturthi' day, Ganesh Pratishtapana puja and the rituals were performed. This year, the Pooja was performed by our president Mr. Nitin Rajkuwar & Mrs. Anupama Rajkuwar. The role of priest was performed by Mr. Shekhar Aiyar proficiently. After the puja and aarti, recitation of Ganpati Atharvashirsha was performed. Snacks were served to all the present members. In the evening session Maha-aarti was performed. Mahaprasad was served to all the present members. There were large number of members present for the evening Aarti. On Tuesday, 10th September Ganesh Ustav, morning Puja and Aarti was performed. In the evening the visarjan pooja was performed.
 
On Saturday, 14th September Ganesh Visasrjan program was organised.
 
For this program the Ganeshstotra recitation & drawing competition was organised for the children. In Ganeshstotra recitation Jayad Dongre participated and he performed very well. He was given the prize as there was only one participant. We hope more children will participate next time.
 
For Drawing competition pictures were selected by our member Mrs. Asavari Wadekar. The children enjoyed drawing and coloring the pictures. Ms. Monika Wadekar & Ms. Priyanka Sawant helped to manage the competition and children well. The result for the drawing competition will be announced soon.
 
The main attraction of the program was “Amrutgatha” performed by many of our talented members. This program was based on the compositions by well known marathi saints. Mrs. Mugdha Karanjekar Ratnaparkhi has conceptualised and arranged the program. She got expert guidance by Mr. Pradeep Lad and Mr. Jairam Parmeshwaran. These compositions were sung by  Mrs. Shruti Pendharkar, Mrs. Kalpana Bhende, Mrs. Aasavari Wadekar, Mrs. Poona Maisoor, Mrs. Mugdha Karanjakar Ratnaparkhi, Ms. Karishma Patade, Mr. Jairam Parmeshwaran,  Mr. S. Narayanmurthy and Mr. Prasad Patil. They were accompanied on Tabla by Mr. Sharad Datar & Mr. Pradeep Lad and on harmonium by Mr. Jairam Parmeshwaran and new member Shashwat Gandhi. The participants received great applaud from the audience.
 
After the program all proceeded towards the beach by the bus arranged by the Mandal. The Aarti was performed before bidding farewell to lord Ganesha. After the aarti the immersion of the Ganesha took place. All the present members enjoyed the mahaprasad and started their return journey.
 
Many of our members helped to make this program successful by offering donations and by helping as volunteers for many small and big tasks. Mandal is thankful to them.
 
The photographs and videos of the program have been uploaded to the mandal website. Please visit our website and enjoy the moments captured by Sandeep Bhatwadekar, Rupesh Patade and Amit Ratnaparkhi.
 
See you all at our next program which will be announced soon.
 
Ganapati Bappa Morya….!! Pudhchya Varshi Lavkar Ya…!!
 
Regards,
Maharashtra Mandal, Hong Kong.